गुढीपाडव्यांनंतर मनसे आक्रमक, घाटकोपरमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा

गुढीपाडव्यांनंतर मनसे आक्रमक, घाटकोपरमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा

गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी, ‘ मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा,अन्यथा आम्ही हनुमान चाळीस लावू ,’ असा इशारा दिला होता. या आदेशाचे पालन करण्यास मनसैनिकांनी सुरवात केली आहे. मनसैनिकांनी घाटकोपरमधील मनसेच्या शाखेबाहेर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यास सुरवात केली आहे.

मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरावा नाहीतर, आम्ही हुनुमान चालिसा लावू असा, इशारा राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यानंतर याबाबत मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. घाटकोपरमधील मनसे शाखेच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी स्पीकर लावून, हनुमान चालिसा लावण्यास सुरवात केली आहे. रमजान सुरु असताना मनसेने हा आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घाटकोपरच्या मनसे शाखेबाहेर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. मनसे शाखेबाहेर दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपितची आरती आणि इतर हिंदूंच्या आरत्या लावल्या जाणार असल्याचे, मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

हनुमान चालिसा तेव्हाच थांबेल जेव्हा मशिदींवरील भोंगे थांबतील. शाखेबाहेरील स्पिकरमुळे तणावाचं वातावरण होऊ शकत नाही, कारण जसे अजान लावले जाते तसेच आम्ही हिंदूंच्या आरत्या लावू, अशी माहिती मनसे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांनी टीव्ही ९ ला दिली आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या

अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी

‘संडे स्ट्रीट’ साठी आणखी तीन नवे मार्ग

‘मविआ पेटीएमने मतदारांना पैसे देतेय’

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबद्दल आक्रमक भूमिका घेतली होती. कंबोज यांनी त्यांच्या ट्विटरवरून, मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याची मोहीम हाती घेण्याची विनंती मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंना केली होती.

Exit mobile version