“अप्रामाणिकपणा केला असेल तर फाशी द्या”

राहुल गांधींच्या ‘अदानी-अंबानी’ आरोपावर पंतप्रधान मोदी यांचे आव्हान

“अप्रामाणिकपणा केला असेल तर फाशी द्या”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी हे आरोप करत असतात की मोदी सरकार हे काही निवडक उद्योगपतींना पाठींबा देत आहे. यावर नरेंद्र मोदी यांनी सरकारची आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली. संपत्ती निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असून यात काही चुकीचं किंवा अप्रामाणिकपणे कोणाचा फायदा केला असेल तर शिक्षेला सामोरा जाण्यास तयार असल्याचं ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.

मोदी सरकार हे अदानी-अंबानींचे सरकार असल्याची टीका राहुल गांधी आणि काँग्रेसकडून वारंवार केली जाते. या पार्श्वभूमीवरचं नरेंद्र मोदींनी स्पष्टता दिली आहे. नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, “जवाहरलाल नेहरूजींच्या सरकारला बिर्ला-टाटांचे सरकार म्हणून हिणवलं जायचं. आता या गांधी कुटुंबाची अडचणी अशी आहे की, माझ्यावर अशाच पद्धतीने हिणवायची इच्छा आहे,” असं उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिल आहे.

“काँग्रेसने यापूर्वी कधी निवडणुकीत एवढी मेहनत केली नव्हती. मी तिसऱ्यांदा जिंकून येईन आणि असं झालं की आई-वडिलांची, आजी-आजोबांची काहीच इज्जत राहिली नाही. ते प्रत्येक गोष्ट याच्याशी तुलना करतात. लाल किल्ल्यावरून बोलतो की, या देशात संपत्ती निर्माण करणाऱ्यांची इज्जत ठेवली पाहिजे. सामर्थ्यवान, सक्षम लोकांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे”, असं मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेला पकडले

नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!

“नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवा; गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू”

तीन तलाकमुळे संसार तुटला, केले हिंदू युवकाशी लग्न

“१५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांच्या यादीत खेळाडू आणि यश मिळविणाऱ्यांना बोलावतो. देशचं कर्तृत्वाची पूजा करत नाही आणि त्याची कदर करत नाही, तर शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ माणसे आपल्याला कशी मिळणार? सर्व स्तरातील यशवंतांचा सन्मान केला पाहिजे,” असं मत पंतप्रधान मोदी यांनी मुलाखती दरम्यान मांडले. “जर मी अप्रामाणिकपणा केला असेल तर मला फाशी द्या. जर मी चुकीच्या मार्गाने कोणाचाही फायदा केला असेल तर मला फाशी द्या. पण मी माझ्या देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर करणार,” असं स्पष्ट मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. असंही त्यांनी स्पष्ट केलं.संपत्ती निर्माण करणाऱ्यांची आणि कामगारांची त्यांना सारखीच काळजी वाटते. “माझ्यासाठी तो भांडवलदारांचा पैसा, व्यवस्थापकीय लोकांची हुशारी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या कष्टकऱ्यांचा घाम याचा मी आदर करतो, असंही ते पुढे म्हणाले.

Exit mobile version