माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कुटुंबात दहशतवादी?

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कुटुंबात दहशतवादी?

योगी सरकारने मुख्तार अन्सारी हा दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. तसेच पंजाब सरकार त्याच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी मुख्तार यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की ते स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबातील आहेत आणि त्यांच्याच कुटुंबातील हमीद अन्सारी हे भारताचे उपराष्ट्रपती राहिले आहेत, असे सांगून स्वतःचा बचाव केला आहे.

पंजाबच्या रोपड कारागृहात असलेल्या मुख्तार अन्सारी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे सांगितले केला आहे की ते माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कुटूंबातून येतात. ते म्हणाले की, देशाला त्यांच्या कुटूंबातून स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यपाल देखील मिळाले आहेत. अन्सारी यांनी उत्तर प्रदेश कारागृहात बदली केल्याचा निषेध म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

योगी सरकार बर्‍याच काळापासून मुख्तार अन्सारी यांना यूपीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर पंजाबच्या रोपड जेलने अन्सारी यांना यूपीमध्ये पाठवण्यास करण्यास नकार दिला आहे. यासाठी त्यांनी मुख्तार अन्सारी यांची तब्येत ठीक नसल्याचे कारण दिले आहे. खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. सोमवारी अन्सारी यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ते माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कुटुंबाचे असल्याचा दावा केला.

त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकारने मुख्तार अन्सारी हे दहशतवादीअसल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात केला आहे. पंजाब सरकार त्याला (अन्सारी) समर्थन देत असल्याचा आरोप केला आणि अन्सारीला पंजाबमध्ये पंचतारांकित सुविधा मिळणार आहे, असा दावाही यूपी सरकारने केला आहे. यूपी सरकारतर्फे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की अन्सारी यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि खटले उत्तर प्रदेशात प्रलंबित आहेत.

तुषार मेहता म्हणाले की दोन वर्षांपूर्वी त्यांना एका खटल्यात पंजाबमध्ये आणण्यात आले होते आणि तेव्हापासून ते येथे तुरूंगात आहेत. संबंधित खटला लक्षात घेता त्यांची यूपी कारागृहात बदली करण्यात यावी. उत्तर प्रदेशातील प्रलंबित प्रकरणात अन्सारी कोर्टात हजार होणे टाळत आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Exit mobile version