गुरुग्राममध्ये रस्त्यावरील नमाजावरून राडे

गुरुग्राममध्ये रस्त्यावरील नमाजावरून राडे

हरियाणाच्या गुरुग्राम परिसरात रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांना पुन्हा आंदोलकांच्या गर्दीचा सामना करावा लागला. अनेक हिंदूवादी विचारसरणीच्या गटातील लोकांनी रस्त्यावर नमाज अदा करण्याच्या विरोधात घोषणा देण्याला विरोध केला. ‘गुरुग्राम प्रशासन, तुमच्या झोपेतून जागे व्हा’ असे फलक हातात धरले होते.

सेक्टर १२-ए मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे ३० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीला सेक्टर १२-ए आणि ४७ मध्ये जोरदार निदर्शने केल्यानंतर, पोलिसांनी आज त्वरीत कारवाई केली.

“येथे सर्व काही शांततापूर्ण आहे. आम्ही नमाज विस्कळीत करण्यासाठी येथे आलेल्या लोकांना ताब्यात घेतले आहे. आम्ही गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला (पण) आज आम्ही जलद कारवाई केली आहे.” असे गुरुग्रामच्या एसडीएम अनिता चौधरी यांनी एनडीटीव्हीला सांगितले.

हे ही वाचा:

त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही

उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ

दिल्ली सीमेवर तणाव निवळला?

राष्ट्रवादीचा पोपट रोजच बोलतो

“लोकांनी ३७ ठिकाणी नमाज अदा केली आहे, (आणि) जे लोक नमाज अदा करत आहेत त्यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल,” त्या म्हणाल्या.

आजच्या घटनेतील व्हिज्युअल्समध्ये लोकांचा एक छोटासा गट निदर्शने करत, बॅनरबाजी करत, ‘बंद करो, बंद करो’ (बंद करा, बंद करा’) असं म्हणत असल्याचे दिसून आले.

दुसर्‍या व्हिडिओमध्ये त्यांच्यापैकी काहींना पोलिस घेऊन जात असल्याचे दिसून आले, क्लिपमध्ये मोठ्या संख्येने पोलिस दिसत आहेत आणि सर्वत्र पोलिस बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

Exit mobile version