जम्मू-काश्मीरमधील पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) मधून सज्जाद लोन यांचा पक्ष बाहेर पडला आहे. नुकत्याच झालेल्या डीडीसीच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरंस या पक्षाविरुद्ध उमेदवार उभे केल्याचा आरोप लोन यांनी केला आहे.
नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, पीपल्स कॉन्फरन्स, इंडियन नॅशनल काँग्रेस, अवामी नॅशनल कॉन्फरन्स आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे सहा प्रमुख पक्ष गुपकार डिक्लरेशन मध्ये आहेत. कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या डिक्लरेशनने घोषित केले आहे.
यामुळे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी या सर्व पक्षांना “गुपकार गॅंग” असे नाव दिले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला हे सार्वमताने या “गुपकार गॅंग”चे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. सज्जाद लोन यांनी फारूख अब्दुल्ला यांना पात्रातून असे कळवले की, पीईजीडीच्या ध्येयधोरणांचे पालन हे जमिनीवर होताना दिसत नाही. असे कारण देऊन त्यांनी पीईजीडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
डीडीसी निवडणुकांमध्ये गुपकार अलायन्सला अपेक्षित यश न मिळाल्याने अलायन्समध्ये पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याची वेळ आली आहे अशी टीका भाजपाने केली आहे. याच आऱोप-प्रत्यारोपांमुळे सज्जाद लोन यांचा पीपल्स कॉन्फरंस हा पक्ष बाहेर पडल्याचेही भाजपाने पुढे सांगितले आहे.
यामुळे गुपकार गॅंगला गळती लागणार का? असा प्रश्न आहे.