एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सदावर्ते यांना अटकेपासून संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. मंगळवार २६ एप्रिल रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत आहेत. शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सदावर्ते त्यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस स्थानकांत तक्रारी करण्यात आल्या आणि गुन्हेही दाखल करण्यात आले.
मुंबई, पुणे, सातारा, बीड, कोल्हापूर, अकोला, सोलापूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबाही एका पोलिसांकडून दुसऱ्या पोलिसांकडे जाताना दिसत होता. आज सदावर्ते यांना पुणे पोलीस ताब्यात घेणार होते. पण सदावर्ते यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच त्यांना जामिनाही मंजूर करण्यात आला आहे. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्याबर हा जामिन देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार
किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!
उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज केला कमी
नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या सदावर्ते यांना नंतर सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. तर त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा घेतला आहे. आज पुणे पोलिसांच्या ताब्यात त्यांची रवानगी होणार होती. पण न्यायालयाने यात हस्तक्षेप केला असून सदावर्ते यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.