एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच सदावर्ते यांच्यासोबत एसटीच्या ११५ कर्मचाऱ्यांनाही कोर्टाने जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात या सर्व आरोपींना कोर्टाने जामिनावर मुक्त केले आहे.
राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. या प्रकरणात भडकाऊ भाषण केल्याचा ठपका एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ठेवण्यात आला होता. गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण केल्यामुळेच कर्मचारी आक्रमक होत पवारांच्या निवास्थानी चाल करून गेल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे होते. त्यामुळेच गुणरत्न सदावर्ते आणि इतर एसटीच्या ११५ कर्मचाऱ्यांना मुंबईतील गावदेवी पोलिसांमार्फत अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड
गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश
‘हिंदुत्वावर मते मागणारे मुख्यमंत्री हनुमान चालिसाला विरोध करतात!’
आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
पण आज म्हणजेच शुक्रवार, २२ एप्रिल रोजी या सर्व आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते मुख्य आरोपी असून एसटी कर्मचाऱ्यांना सह आरोपी करण्यात आले आहे. सध्या हे सर्व एसटी कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत.
तर जामीन मिळाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कर्मचारी महाराष्ट्र सरकार विरोधात अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची नेमकी भूमिका काय असणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.