गुणरत्न सदावर्तेंना अटक

गुणरत्न सदावर्तेंना अटक

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आता पोलीस कारवाई करण्यात आली आहे. एसटी कामगारांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

गेले पाच महिने विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाचा कडेलोट आज पहायला मिळाला. आंदोलन करत असलेले हे एसटी कर्मचारी हे आज थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर चालून गेले. यावेळी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर आंदोलनाने हिंसक वळण घेत काही आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली. या संपूर्ण घटनेचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.

हे ही वाचा:

पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती

नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने समर्थनीय नाहीत.

आंदोलकांच्या भितीने अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असतानाच त्यांच्याच पक्षाध्यक्षाच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला होणे हे गृहखात्याचे खुपच मोठे अपयश मानले जात आहे. अशा या गंभीर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई येथील गावदेवी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले.

तर चौकशी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. भडकाऊ भाषण करण्याचा ठपका सदावर्ते यांच्यावर पोलिसांनी ठेवला आहे. अटक झाल्यावर जे.जे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. शनिवार ९, एप्रिल रोजी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी नवे काय समोर येणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version