एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यांनतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांनतर त्यांच्या अडचणीत वाढ होत गेली आणि २६ एप्रिलला ते तुरुंगातून बाहेर आले. नंतर ते पुन्हा जोशाने सरकारविरोधात भूमिका घेणार हे त्यांच्या वागण्यावरुन स्पष्ट झाले होते. मात्र ही भूमिका ते आंदोलनातून मांडणार की नवी राजकीय कारकीर्द सुरु करणार हे मात्र स्पष्ट झाले नव्हते. गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहेत. सदाववर्ते हे एसटी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत.
तब्बल दोन हजार कोटींहून अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेच्या राज्यात ५० शाखा आहेत. तर एसटी बँकेचे राज्यात सुमारे ९० हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार या निवडणुकीत उतरतील.
हे ही वाचा:
गांजा है पर धंदा है ये… (प्रेम,वडापाव आणि गांजा)
चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी होणार सर्वात मोठे क्रीडापटूंचे पथक
पोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास
बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम
गुणरत्न सदावर्ते यांनी संपात सहभागी असताना कायम आपल्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच ठेवले होते. शिवाय शरद पवार यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान केले, जाणीवपूर्वक तेच विलिनीकरण टाळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेताना सदावर्ते दिसणार आहेत.