गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरवारी, २१ एप्रिल रोजी कोल्हापूर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल मध्यरात्री सदावर्ते यांना कोल्हापूरात आणण्यात आले होते. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर पोलीस सोमवार, १८ एप्रिल रोजीच सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी गिरगाव न्यायालयात वकील सदावर्तेंच्या ताबा घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार रीतसर ताबा घेत आज कोल्हापूर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायलयात सरकारी वकिलाने सदावर्तेंना जास्तीच जास्त कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले.
सदावर्तें यांच्या ताब्यसाठी अकोट पोलिसांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयीन कोठडी मिळाल्याशिवाय अकोट पोलिसांना ताबा देता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा सदावर्तेंची शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मराठा समाजाविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत सदावर्तेंनी काही वक्तव्य केली होती. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नोंदवला आहे.
हे ही वाचा:
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!
गृह विभागाचा भोंगळ कारभार सुरूच! बदल्यांच्या आदेशाला २४ तासांच्या आत स्थगिती
खंडणी मागणारी धनंजय मुंडे यांची मेहुणी
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली. सदावर्तेंच्या घरी पैसे मोजण्याची मशीन सापडली होती. परळमध्ये सदावर्तेंनी ६० लाखांची मालमत्ता आणि २३ लाखांची खरेदी केल्यची सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात सांगितले होते.