राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते हे कोठडीत होते. त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली असून सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदावर्तेंची आज, १३ एप्रिल रोजी दोन दिवसांची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्यांना आज पुन्हा गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील प्रदिप घरत यांनी सदावर्तेंची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच, चंद्रकांत सूर्यवंशी आणि अभिषेक पाटील या दोन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या १४ दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत सदावर्ते हे जामिनासाठी अर्ज करू शकतात. सदावर्तेंसह सात आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, यामध्ये सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांचा देखील समावेश आहे. एन.ए. पटेल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्याशिवाय सदावर्तेंचा ताबा घेण्यास सातारा पोलिसांनी मुंबई पोलिसांनी ना हरकत दर्शवली आहे. त्यानुसार, सातारा पोलिसांनी आज न्यायालयात आज अर्ज दाखल केला होता त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे असणार आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांनी पुन्हा केला बाबासाहेब पुरंदरेंना विरोध
श्रीलंकेपाठोपाठ नेपाळचाही घात; त्यात चीनचा हात
नवाब मलिकांची १४७ एकर जमीनीसह आठ मालमत्ता जप्त
दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयाला भेट
दरम्यान, सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी आज न्यायालयात अनेक धक्कादायक खुलासे केले. सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांकडून रक्कम गोळा करुन दोन कोटी रुपये जमवले. ती रक्कम त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे त्यांनी दिली. पण आता जयश्री पाटील या फरार आहेत, असा धक्कादायक दावा घरत यांनी केला आहे.