एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना मुंबईतील किला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सदावर्ते यांना किला न्यायलयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर १०९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती के जी सावंत यांनी खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी केली आहे.
११ एप्रिल पर्यंत सदावर्ते यांना पोलीस कोठडी झाली आहे. दोन दिवस सदावर्ते यांची कसून चौकशी होणार आहे. तसेच इतर १०९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून ते जामिनासाठी अर्ज करू शकणार आहेत. मात्र गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली असून, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. न्यायालयाची सुनावणी ऐकताच जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी लोकशाही शिल्लक राहिलेली नाही असे म्हणत घोषणाबाजी करण्यास सुरवात केली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील आणि वकील महेश वासवानी, घनश्याम उपाध्याय यांनी सदावर्ते यांची बाजू खंडपीठासमोर मांडली आहे. एका तासात तिन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. सदावर्ते यांच्यासह १०९ आंदोलकांवर न्यायालयात सुनावणी झाली आहे.
हे ही वाचा:
‘लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न’
आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या
‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया
सोमय्या पिता पुत्रांना मुंबई पोलिसांचे समन्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्लाबोल केला. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्कते यांना जबाबदार ठरवत मुंबई पोलिसांनी त्आयांना अटका केली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण १०९ जणांना मुंबईतील किला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायलयात जाताना सदावर्ते यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. सदावर्ते यांच्या पत्नीने देखील त्यांच्या कुटुंबाला धोका असल्याचे माध्यमांना सांगिते होते.