गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सोमवारी, १८ एप्रिल रोजी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयात हजर करण्यात आले होते. सातारा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चार दिवसांपूर्वीच सदावर्तेंना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती, त्यांनतर आज पुन्हा सातारा न्यायालयात सुनावणी झाली असता त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे.

सदावर्ते यांचा मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी ताबा घेतला. त्यांनतर ते सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. सोमवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मदत संपली आणि पोलिसांनी त्यांना सातारा न्यायालयात हजर केले. त्यानंतर सातारा पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयने सदावर्ते यांच्या कोठडीत वाढ केली.

दरम्यान, मुंबई, सातारासह सदावर्ते यांच्यावर पुणे, कोल्हापूर, बीड,अकोला या ठिकाणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या जिह्ल्यातील पोलीस सदावर्ते यांचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी ८ एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. दरम्यान पहिल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याच काम वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

हे ही वाचा:

अमरावती, मुंबईनंतर बीडमध्येही धार्मिक कार्यक्रमात हिंसाचार

कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

‘वेडे समजता का? पाणीपुरवठा करण्यात काय अडचण?’

यातच आता गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सदावर्ते यांनी छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांचा एकेरी नावाने उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version