एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सोमवार, २५ एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांनतर सदावर्ते यांनी कोल्हापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. कोल्हापूर न्यायालयाकडून त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र आता पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२१ एप्रिल रोजी कोल्हापूर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांनतर आज सदावर्तेंना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयात आज त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि मग सदावर्तेंनी जामिनासाठी अर्ज केला. त्यांचा जामीन कोल्हापूर न्यायालयाने मंजूर केला आहे. सदावर्ते यांना मुंबईला आणले जाणार आहे. मात्र पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कामगारांनी हल्ला केला होता. हा हल्ला एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीखोर वक्त्यव्यामुळे करण्यात आला असा आरोप त्यांच्यावर झाला. मग सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनतर सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होत गेली. सदावर्ते यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
हे ही वाचा:
सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार
कर्नाटकमध्ये दोन दलित तरुणांची हत्या
लाकडांमध्ये लपवले होते ७०० कोटींचे हेरॉईन
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली. सदावर्तेंच्या घरी पैसे मोजण्याची मशीन सापडली होती. परळमध्ये सदावर्तेंनी ६० लाखांची मालमत्ता आणि २३ लाखांची खरेदी केल्यची सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात सांगितले होते.