जम्मू- काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेेते गुलाम नबी आझाद यांनी गुज्जर देश चॅरिटेबल ट्रस्टच्या एका कार्यक्रमात मोदींची स्तुती केली आहे.
हे ही वाचा:
गुज्जर समुदायासमोर आणि काही जम्मू- काश्मिर नेत्यांच्या उपस्थितीत आझादांनी मोदींचे कौतूक केले आहे. ते म्हणाले की, मोदी कधीच त्यांचा भूतकाळ लपवत नाहीत आणि त्यांचे मूळ खेड्यात असल्याचे देखील लपवत नाहीत. यावेळी आझादांनी, मोदींशी कदाचित राजकीय मतभेद असतील परंतु ते स्वतःशी प्रामाणिक असल्याचे कौतूक देखील केले. जे स्वतःशी प्रामाणिक नसतात, ते कृत्रिम जगात जगतात असेही आझाद म्हणाले.
“मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी आवडतात. मी स्वतः खेड्यातून येतो आणि मला त्याचा अभिमान आहे. आपले पंतप्रधान जे एकेकाळी चहा विकायचे ते सुद्धा खेड्यातून येतात. माझे त्यांच्याशी राजकीय मतभेत असतील परंतु ते स्वतःशी प्रामाणिक आहेत”, असे आझाद म्हणाले.
“जे स्वतःशी प्रामाणिक नसतात, ते कृत्रिम जगात जगतात. मी जगभर प्रवास केला आहे आणि पंचतारांकित, सप्ततारांकित हाॅटेलमध्ये राहिलो आहे, पण जेव्हा मी माझ्या गावातल्या लोकांसोबत बसतो तेव्हा एक वेगळीच भावना निर्माण होते” असेही आझाद म्हणाले.
याचप्रसंगी गुलाम नबी आझादांनी सोनिया गांधीना पत्र लिहीणाऱ्या नेत्यांचे कौतूक देखील केले, आणि ते महात्मा गांधीचा वारसा चालवत असल्याचे देखील सांगितले.