26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणउत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी

उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी

Google News Follow

Related

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुजरातने उत्पादन क्षेत्रात मुसंडी मारली असून महाराष्ट्राला मागे टाकले आहे. उत्पादन क्षेत्राचे नवे हब म्हणून गुजरात उदयास येत आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये गुजरातने उत्पादन क्षेत्रात १५.९ टक्के एवढी वाढ नोंदवली असून महाराष्ट्रात ७.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

गुजरातमध्ये २०१२ आणि २०१९ या कालावधीमध्ये ५.८५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे तर, याच कालावधीत महाराष्ट्रात ४.०७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. अहवालामध्ये गुजरात सरकारने उद्योगाभिमुख धोरण राबविल्याचे म्हटले आहे. गुजरातमध्ये झालेल्या उच्च गुंतवणुकीमुळे राज्याला उत्पादन वाढीमध्ये देशाच्या इतर राज्यांपेक्षा पुढे जाण्यात मदत झाली आहे.

हे ही वाचा:

अखेर विराटने जिंकली नाणेफेक! पहिल्या दिवशी फक्त ७८ षटकांचा खेळ

महाराष्ट्र अलर्टवर! ओमिक्रोन मुंबईच्या उंबरठ्यावर?

ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह

वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?

महाराष्ट्र उत्पादन क्षेत्रात मागे पडल्यामुळे भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, गुजरातमध्ये उद्योग क्षेत्राला अनुकूल अशा सर्व सोयीसुविधा राज्य सरकार तर्फे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतात. मुख्य म्हणजे कोणत्याही उद्योगपतीच्या घराबाहेर आजपर्यंत जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आलेल्या नाहीत, असा टोला अतुल भातखळकर यांनी सरकारला लगावत बाकी आपण सुज्ञ आहातच, असे ट्विट मध्ये म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा