भाजपावर टीका करण्यासाठी केजरीवाल यांनी अभिनेत्याला दिली ‘सुपारी’

भारतीय जनता पार्टीने केला आरोप

भाजपावर टीका करण्यासाठी केजरीवाल यांनी अभिनेत्याला दिली ‘सुपारी’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत.  त्यांचे गुजरातच्या विविध भागात दौरे सुरू आहे. याच दौऱ्याचा एक भाग म्हणून केजरीवाल १६ ऑगस्टला कच्छ जिल्ह्यातील भूज येथे गेले होते. येथील टाऊनहॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये शाहबाज खान नावाचा एक युवक केजरीवाल यांचे तोंडभरून कौतुक आणि भाजपवर कडकडून टीका करताना दिसत आहे. परंतु हा शाहबाज खान प्रत्यक्षात अभिनेता असून त्याला या कार्यक्रमात अभिनय करण्यासाठी आमंत्रित केले होते असा दावा भाजपने केला आहे.

एक मिनिट ४३ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये हा युवक “मी २२ वर्षांचा आहे. मी माझे शिक्षण सोडले आहे. मोदीजींनी इथे अनेक घोषणा दिल्या. भ्रष्टाचार संपवू, अजून काही संपले नाही. मी दोरा गावातून आलो आहे. २०१२ मध्ये माझे डोळे उघडले होते. मी ७ वी मध्ये माझे शिक्षण सोडले होते. आता २०२२चालू आहे. आठ वर्षे या लोकांनी शाळा बांधल्या नाहीत. काहीही करणार नाहीत देश बर्बाद केला आहे, असे म्हणताना दिसत आहे. देशाचा काहीच विकास झाला नाही आपल्या सारख्या लोकांची गरज आहे.

यानंतर दिल्ली भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत. ही छायाचित्रे प्रत्यक्षात इंस्टाग्राम अकाउंटचे स्क्रीनशॉट्स आहेत. यामध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा शाहबाज खान दिसत आहे. स्क्रिनशॉट्समध्ये दिसत आहे की, शाहबाज खान नावाच्या इंस्टा प्रोफाइलमध्ये तो अभिनेता असल्याचे लिहिले आहे.

नेटिझन्सने पण घेतला शोध

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अनेक नेटिझन्सने देखील शाहबाज खानचे इन्स्टा खाते सापडल्याचा दावा केला आहे. याचे अनेक स्क्रीनशॉट ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. हे खाते त्याच तरुणाचे आहे हे स्पष्ट झाले नसले तरी, जे सीएम केजरीवाल यांच्या कार्यक्रमात बोलले होते. त्याचवेळी चर्चेत आल्यानंतर हे खाते काढून टाकण्यात आल्याचे दिसते. आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडला नाही.

Exit mobile version