गंगेतील मृतदेहांवरील कविता म्हणजे एक कट

गंगेतील मृतदेहांवरील कविता म्हणजे एक कट

गंगा नदीतील प्रेतांचे राजकारण देशातील सर्व भागांमध्ये मोठ्या पातळीवर झाले. अनेकांनी प्रेतांचे संदर्भ मोठ्या प्रमाणावर राजकारणाशी लावले. एकीकडे याच गंगेत प्रेते टाकण्याच्या मुद्दयावरून आता वेगळेच रामायण साहित्य विश्वात घडले आहे. गुजरात साहित्य अकादमीने पारूल खक्कर यांची गंगेतील प्रेतांवर लिहिलेली कविता हे कटकारस्थान असल्याचे म्हटले आहे. गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष विष्णू पंड्या यांनी हे विधान त्यांच्या संपादकीयमधून केले आहे. अकादमीने ही कविता कटकारस्थानाचा भाग आहे, असा सरळ आरोप केलेला आहे.

गुजरात साहित्य अकादमीच्या जूनच्या शब्दसृष्टी मासिकाच्या संपादकीयमध्ये हा आरोप करण्यात आलेला आहे. उगाचच अशा पद्धतीचे हे लिखाण करून केंद्राच्या माथ्यावर खापर फोडण्याचा या कवितेचा हेतू होता.

ही कविता अशा पद्धतीने जनमानसात पसरवणारे साहित्य क्षेत्रातील नक्षली असल्याचेही पंड्या यांनी म्हटले आहे. देशामध्ये सध्या कुठल्याही कारणांवरून केंद्र सरकारच्या धोरणांबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच हे कुणीतरी घडवून आणल्यासारखे वाटत आहे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी दिला ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ चा नारा

पालिकेच्या टक्केवारी कारभाराबद्दल शिवसेनेतच खदखद

सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलय

‘घरी रहा, योगाभ्यास करा’…७ व्या योग दिनाची संकल्पना

विष्णू पंड्या यांनी ही कविता म्हणजे उगाचच केलेला आकांडतांडव असल्याचे म्हटले आहे. केंद्राच्या विरोधातील धोरणे राबविण्यासाठी आता विरोधी विचारसरणीचा वापर असाही केला जात आहे. डावे आणि उदारमतवादी यांनी देशामध्ये अराजकता पसरावी अशाच हेतूने ही कविता करण्याचा हेतू स्पष्ट दिसत आहे.

पंड्या यांनी असेही म्हटले आहे की, यात कवितेचा अंशही दिसत नाही किंवा ती कवितेच्या ढंगानेही लिहिली गेलेली नाही. मनातील नैराश्याला वाट मोकळी करून देण्यासाठी ती कविता लिहिली गेली. त्याचा गैरफायदा डाव्या आणि उदारमतवादी लोकांनी घेतला. एकीकडे ही कविता इतरांच्या खांद्यावरून बंदुक चालवावी अशाच रीतीने प्रसारित करण्यात आली. देशामध्ये केवळ गोंधळाचे वातावरण निर्माण व्हावे याच हेतूने साहित्य क्षेत्रातील घाणेरडा हेतू आता समोर आलेला आहे.

 

Exit mobile version