गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

राजीनामा दिल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रुपाणी म्हणाले,  मी राजीखुशीनं राजीनामा दिला आहे, कुणाचाही माझ्या दबाव नाही.  मला संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच माझ्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो,  पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडणार आहे.

रुपाणी पत्रकार परिषदेआधी राज्यपालांना भेटले. राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली. रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहे. गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे.

हे ही वाचा:

कायद्याचा धाक राहिलेला नाही, सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे

साकीनाका बलात्कार पीडितेची झुंज अपयशी

‘केरळ मॉडेल’ पुन्हा पहिल्या क्रमांकावर

९/११ ची २० वर्ष आणि तालिबान

गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र त्याआधीच . मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली. विजय रूपाणी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते गुजरात विधानसभेत पश्चिम राजकोटचे प्रतिनिधित्व करतात ७ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांनी गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षही आहेत. विजय रुपाणींचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी रंगून, बर्मा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमणिकलाल आणि आईचे नाव मायाबेन. ते जैन धर्माचे अनुयायी होते. रमणिकलाल कुटुंब १९६० मध्ये बर्मा सोडून भारतात आले. मग ते राजकोट, गुजरात येथे राहू लागले. विजय रुपाणींनी धर्मेंद्रसिंह महाविद्यालयातून पदवी घेतली आणि नंतर सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी केले.

Exit mobile version