भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी

भाजपा सातव्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार

भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरात आणि हिमाचल प्रदेशात कुणाचे सरकार बनेल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी सुरु असून, गुजरातमध्ये भाजपा आघाडीवर आहे. गुजरातमध्ये २७ वर्षांपासून सत्तेत असलेला भाजपाचे पुन्हा सरकार येईल हे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मध्य  गुजरातमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे.

समोर आलेल्या निकालानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा ३३ आणि काँग्रेस ३३ जागांवर आघाडीवर आहे. तर आप पक्षाला हिमाचल प्रदेशमध्ये खातही खोलता आलेले नाही. तसेच हिमाचलमध्ये अपक्ष दोन उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपा बहुमताच्या खूप पुढे निघून गेला आहे. भाजपाने १३८ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ३३, आम आदमी पक्ष आठ जागा आणि इतर चार जण चार जागेवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, हे आकडे सातत्याने बदलत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी खोटी ठरल्याचे दिसून आले आहे. गुजरातमध्ये आप पक्षाचेच सरकार येणार असं, लिहून देतो केजरीवाल यांनी म्हटले होते. मात्र, आप पक्षाला गुजरातमध्ये फक्त खातच खोलता आल्याचे दिसून आले आहे. आपचे मुख्यमंत्री उमेदवारसुद्धा पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसला अर्धशतकाही पूर्ण करता आलेले नाही.

हे ही वाचा:

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे. तसेच उत्तर गुजरात, अहमदाबाद, कच्छ -सौराष्ट्र, मध्य गुजरात, गांधीनगर, बडोदा आणि गोद्रामध्ये भाजपा आघाडीवर आहे. बडोद्यामध्ये भाजपाने दहा पैकी नऊ जगणावर विजय मिळवला आहे. अहमदाबादमध्ये भाजपा १३ आणि काँग्रेसने ८ जगणावर विजय मिळवला आहे. कच्छ सौराष्ट्रमध्ये भाजपा २५ आणि काँग्रेस नऊ जागांवर आघाडीवर आहे.

Exit mobile version