रायगडचा इतिहास सांगणाऱ्या गाईडना पाच लाखांचा विमा

३५०व्या राज्याभिषेक दिनी रायगडावर होणार वितरण

रायगडचा इतिहास सांगणाऱ्या गाईडना पाच लाखांचा विमा

रायगडचा इतिहास अनेक वर्ष हुबेहूब मांडणाऱ्या तब्बल २२ गाईडना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्या वतीने रायगडच्या गाईडना हा मदतीचा हात दिला आहे.

किल्ले रायगडावरील एकूण २२ गाईड येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगत असतात. अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत सर्व गाईड स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचा इतिहास पर्यटकांपर्यंत पोहोचवत असतात.

१९ फेब्रुवारी २०२१ पासून रायगडावरील १.राजसदर येथील श्री शिवछत्रपतींचा पूर्णाकृती मूर्ती २.होळीचा माळ येथील पूर्णाकृती मूर्ती ३.शिरकाई देवीचे मंदिर ४. श्री जगदीश्वर मंदिर आणि ५.शिवसमाधी या सर्व ठिकाणी दररोज पुष्पहार अर्पण केले जातात.* त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गाईडना आरोग्य विमा संरक्षण.

हे ही वाचा:

हिंदू नावाचा वापर करून त्याने मॉडेलला फसवले, पण द केरळ स्टोरीने दिली तिला प्रेरणा

रेल्वेत मिळाला २ लाखांचा फोन, त्याने विकला ३५०० रुपयांना…

कर्नाटकनंतर आता राजस्थान काँग्रेस सरकारकडून ‘फुकट’ची वीज

ताडोबात ‘वीरा’ वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

यामध्ये रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकिरकर (अध्यक्ष), रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश ऑकिरकर, गणेश झोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सिताराम अवकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीप अवकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर, आकाश हिरवे, रमेश अवकीरकर, सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर अशा एकूण २२ गाईडचा समावेश आहे. वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजार समावेश आहे. यामध्ये गाईडच्या कुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे. २ जून रोजी ३५० व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्य विमा संरक्षण पत्र सर्व गाईडना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे.

Exit mobile version