महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधले वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या वारसदारांनी तब्बल सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेला ट्रस्ट घशात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे संघटनेतील गटबाजी उघड पडली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत दोन गट पडले असून एक गट डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव हमीद दाभोळकर आणि कन्या मुक्ता दाभोलकर यांचा आहे. तर दुसरा गट कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासोबत आहे.
हमीद आणि मुक्ता दाभोलकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचा आरोप अविनाश पाटील यांनी केला आहे. तरी याच वेळी त्यांनी दाभोलकर कुटुंबीयांवर घराणेशाहीचाही आरोप केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर समितीतील गटबाजी आणि वाद अधिक प्रकर्षाने उघडे पडले आहेत.
हे ही वाचा:
…म्हणून अफगाणिस्तानमध्ये वाढली ‘पुरुषां’ची संख्या
दादा काय सांगता…वाईन म्हणजे दारू नाही?
आश्चर्य!!! सहा महिने बेशुद्ध राहून कोरोनावर केली मात
‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निधनानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दाभोलकरांच्या कुटुंबियांना समितीत सक्रिय होण्यास आक्षेप घेतला होता. तर आता एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर त्यांच्याबद्दल सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटाने घेतला. पण यालाही कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी विरोध केला आहे. जून महिन्यात संस्थेच्या कार्यकारणीत हा निर्णय घेण्यात येईल असे पाटील यांनी पत्रक काढून सांगितले आहे. तर याच वेळी दाभोलकर कुटुंबीयांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
वारसा हक्क आणि घराणेशाही ने पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे हे म्हणताना त्यांचा रोख हा दाभोलकर कुटुंबीयांनी वरच असल्याचे स्पष्ट आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून स्वतः प्रत्यक्ष काहीही काम न करता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करून कामाचे श्रेय लाटू नये असेही पाटील यांनी म्हटले आहे.