महान संस्कृती आणि मेहनती लोकांचा वारसा लाभलेले राज्य; पंतप्रधानांकडून गौरव

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त प्रमुख राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा

महान संस्कृती आणि मेहनती लोकांचा वारसा लाभलेले राज्य; पंतप्रधानांकडून गौरव

१ मे या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला, नागरिकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत. भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांनीही महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केले आहे की, सर्व महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि विठ्ठल भक्तीत लीन येथील लोक, विकासाच्या वाटेवर अग्रेसर आणि नवे मापदंड कायम करण्यास कटिबद्ध आहेत. राज्याचे कल्याण आणि प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की,  मराठी जनतेला मी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांना वंदन. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आहे. कामगारांच्या आणि  श्रमिकांच्या घामातून महाराष्ट्र घडला आहे, त्यांचे स्मरण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व ही महाराष्ट्राची ओळख आहे. महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वीर सावरकर यांनी सामाजिक सुधारणांचा मार्ग दाखविला. १० महिन्यांपूर्वी सत्तेत आलेले राज्यातील सरकार हे याच महान विभूतींनी दाखविलेल्या मार्गाने काम करत आहे. म्हणून सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही अनेक निर्णय घेतले. जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देऊन राज्याचा सन्मान आणखी वाढवला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे की, हा प्रगतीच्या वाटेवर परत एकदा जोमाने घोडदौड करतोय. राज्याला देशात अग्रभागी ठेवण्याचे आमचे लक्ष्य आहे, हा निर्धार व्यक्त करुन महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो.

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या तमाम नागरिकांना तसेच जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा देतो. छत्रपती शिवरायांनी घडविलेला हा महाराष्ट्र आहे. निर्मिती झाल्यापासून देशातील अग्रणी राज्य म्हणून पुढे जात आहेत. सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्याचे जतन करत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. नऊ महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे निर्णय घेतले ते लोकाभिमुख निर्णय आहेत.

हे ही वाचा:

केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी

‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’

इसिसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी सैन्याबरोबरच्या चकमकीत ठार

जन्मदिनीच झाला पुनर्जन्म!! भिवंडी दुर्घटनेत २० तासांनंतरही तो राहिला जिवंत

महाराष्ट्र भूमी बहुगुणी शोभे देखणी अशा शब्दांत फडणवीस यांनी ट्विट करत महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी असेही लिहिले की, महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले | खरा वीर वैरी पराधीनतेचा | महाराष्ट्र आधार हा भारताचा | सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा ! जय महाराष्ट्र !

 

 

भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥ १ मे १९६०… महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले, महाराष्ट्राचा मंगल कलश मिळवला तो हा सुवर्ण दिन. परंतु त्यासाठी १०६ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. त्या सर्व हुताम्यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

 

महाराष्ट्र ही अद्भूत लोकांची भूमी आहे. ज्यांनी राष्ट्रनिर्माणात महत्त्वपूर्ण योगदान दिले अशांची ही भूमी आहे. समृद्ध असा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version