काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच गळती लागली आहे. अनेक बडे नेते कॉंग्रेस पक्षाची साथ सोडून जात असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. महाराष्ट्रात काही दिवसांच्या या काळात तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला. दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
अनेक बडे नेते पक्ष सोडून जात असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे. विभाकर शास्त्री यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाला साथ दिली आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून ट्विट करत विभाकर शास्त्री यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचं सदस्यत्व सोडल्यानंतर विभाकर यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रृजेश पाठक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विभाकर शास्त्री यांचा राजीनामा काँग्रेसच्या पक्ष संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेश: मराठा कालीन बांधलेल्या विहिरीच्या उत्खननात सापडला ३०० वर्ष जुना शंख आणि शिल्पे!
सर्व पिकांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी दिल्यास आर्थिक आपत्ती
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या निकटवर्तीयाच्या घरावर गोळीबार
‘चर्चेला तयार, परंतु नवीन मुद्दे आणणे थांबवा’
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीचं काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांनीही महाराष्ट्रात काँग्रेसची साथ सोडत महाराष्ट्रात कॉंग्रेसला जोरदार दणके दिले होते.