शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर

शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. अशातच शिंदे सरकारकडून मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर काढला आहे.

मराठा समाजातील तरूणांना उद्योगासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १० लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते. या मंडळासाठी निधी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यासंदर्भातील जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा जीआर ३० कोटींचा आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याची मागणी मराठा संघटना आणि मराठा समाजाकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला तात्काळ निधी देण्याबाबत पावले उचलली आहेत.

सरकारने प्रसिद्ध केलेल्या जीआरनुसार आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला ३० कोटींचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. हा निधी लवकर वाटप करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश वित्त विभागाच्या माध्यमातून काढले असून हा निधी वाटप होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हे ही वाचा:

काळ बदलतोय! रणजीत सावरकरांना विधान परिषद सदस्यत्व मिळणार?

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट

‘धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’

संजय पांडेंवर तीन गुन्हे दाखल, सीबीआयची छापेमारी

यापूर्वी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी मिळत नसल्यामुळे मराठा समाजाकडून तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर आता नव्या सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे मराठा समाजातील तरूणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version