शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पिकची खरेदी विक्री पाहता मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची विक्री करताना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
वर्ष २०२२-२३ मध्ये खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ झाल्याने, शेतकऱ्यांना आता नवीन किंमतीमध्ये शेतकऱ्यांना पिके विकण्याची संधी मिळेल आणि त्यांची कमाई वाढेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने पिकांचा एमएसपी १०० रुपयांनी वाढवून २ हजार ४० रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
ज्ञानवापी सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी
लेडी सचिन तेंडूलकरची क्रिकेटमधून निवृत्ती!
बारावीत पुन्हा मुलीच अव्वल; ९४ टक्के निकाल
‘शिवसेनेची बी टीम कोणती हे स्पष्ट’
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिळाच्या किमतीत ५२३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुगाच्या भावात प्रतिक्विंटल ४८० रुपयांची वाढ होणार आहे. तसेच सूर्यफुलावर प्रतिक्विंटल ३५८ रुपये आणि भुईमुगाच्या दरात ३०० रुपयांनी वाढ होणार आहे. मोदी सरकारने सलग तिसऱ्या वर्षी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७ खरीप पिकांच्या नवीन एमएसपीला मंजुरी देण्यात आली. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.