विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मान्यता द्यावी म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले असता राज्यपालांनी मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषणाच्या वेळी झालेल्या गोंधळावरून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ मार्चला घेण्याची योजना असून त्यासाठी राज्यपालांची मंजूरी आवश्यक आहे. राज्यपालांची मान्यता मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण, नाना पटोले, एकनाथ शिंदे, अनिल परब, जयंत पाटील आदींनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांनी अधिवेशनात झालेल्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांशी चर्चा सुरू असताना राज्यपाल कोश्यारी यांनी अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळाचा विषय काढला. माझे अभिभाषण सुरू असताना तुमच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या, असे ते म्हणाले. ‘आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या आणि ती तुमच्या स्वागतासाठी होती. घोषणा देऊन आमचे लोक शांत झाले होते, असे नेते जयंत पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
पहिल्या दिवसाअखेर भारताने चढवल्या ३५७ धावा
‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’
सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर चर्चा करा
विधान परिषदेतील १२ नियुक्त सदस्यांचा प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबित असल्याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी ठोस उत्तर दिले नसल्याचे वृत्त समोर आले आहे.