राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपाचे अनेक नेते दिल्लीत जाऊन आले. या नेत्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपाचे हे सर्व नेते कालच महाराष्ट्रात आले. त्यानंतर लगेचच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या दिल्ली दौऱ्यात राज्यपाल कोश्यारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोशारी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांचा मुक्काम राहणार आहे. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांचा विशेष सुट देण्यात आला आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्र सदनमध्ये वेगवेगळे सुट राखीव असतात. मात्र गेल्या आठवड्यात राज्यपाल सुटला आग लागली होती. त्यामुळे या सुटचं बरंचसं नुकसान झालं असून त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या राहण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या सुटमध्ये करण्यात आली आहे. मात्र, राज्यपाल दिल्लीत किती दिवसाच्या दौऱ्यावर आलेत याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहेत. तसेच राज्यपालांच्या दिल्लीवारीचं नेमकं कारणंही सांगण्यात आलेलं नाही.

हे ही वाचा:

विनेश फोगाटवर केली ‘ही’ मोठी कारवाई

भांडूपमध्ये बसचा भीषण अपघात

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या दौऱ्यात ते कुणाकुणाला भेटणार आहेत हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. दिल्ली दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असल्याचीही चर्चा आहे.

Exit mobile version