यापुढे उद्धव ठाकरे – कोश्यारींप्रमाणे विमानावरून भांडण होणार नाही!

राज्य शासनाकडून शासकीय विमान, हेलीकॉप्टर वापरण्यासंबंधी सुधारीत नियम लागू

यापुढे उद्धव ठाकरे – कोश्यारींप्रमाणे विमानावरून भांडण होणार नाही!

शासकीय विमान आणि हेलीकॉप्टर वापरण्यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच आता उपमुख्यमंत्र्यांनाही शासकीय विमान आणि हेलीकॉप्टर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय राज्यपालांना शासकीय विमान वापरासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागत होती, ती अटही आता रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाने सुधारीत नियम लागू केले आहेत.

यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणेच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय विमान आणि हेलिकॉप्टर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. पूर्वी राज्यपालांना शासकीय विमान वापरासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागत होती. ती अटही आता रद्द करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात शासकीय विमान वापरा वरुन वाद झाला होता. राज्याच्या राजकारणात हा मुद्दा गाजला होता.

शासकीय विमान वापराच्या प्राधान्यक्रमाच्या नामावलीत पहिल्या क्रमांकावर राज्यपाल आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावे आहेत. राज्यात २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे युती सरकार आल्यानंतर शासकीय विमान वापरासंबंधीचे १९६७ चे नियम कालबाह्य ठरवून १३ फेब्रुवारी २०१५ रोजी नवीन नियम लागू केले होते.

या नियमात राज्य शासनाच्या ताफ्यातील विमान आणि हेलिकॉप्टर वापरण्याकरिता मुख्यमंत्र्यांना प्राधान्य देण्यात आले होते. राज्यपालांना शासकीय विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. राज्य अतिथी किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्ती, केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने शासकीय विमान, हेलिकॉप्टर वापरण्यास मुभा देण्यात आली होती. ती नव्या नियमात कायम ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

दहशतवादी मुझफ्फर, फैसल यांना फाशीची शिक्षा

जो बायडेन यांच्या मुलाला ड्रग्जचे व्यसन, बंदूक बाळगण्याचा आरोप

पाकिस्तानचा खेळ संपला; श्रीलंका अंतिम फेरीत

आधी ‘गदर २’ पाहा तरी…दिग्दर्शकाचा नसिरुद्दीन शहा यांना सल्ला

११ फेब्रुवारी २०२१ रोजी शासकीय विमान वापरावरुन ठाकरे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात वाद झाला होता. राज्यपालांना शासकीय विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते. कोश्यारी यांना विमान वापरण्यास परवानगी न मिळाल्याने त्यांना विमानातून खाली उतरावे लागले होते.

Exit mobile version