२२ जून ते २४ जून कालावधीत मंजूर प्रस्तावांचा तपशील देण्याचे माविआला आदेश

२२ जून ते २४ जून कालावधीत मंजूर प्रस्तावांचा तपशील देण्याचे माविआला आदेश

महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची चिन्हं आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. २२ जून ते २४ जून या कालावधीत सरकारने मंजूर केलेल्या फाईल्स आणि प्रस्तावांचा तपशील राज्यपालांनी मागवला आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक फाईल्स आणि जीआर हे मंत्रालयात घाईने मंजूर करण्यात आल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली होती. याची दखल घेत हे निर्देश देण्यात आले आहेत.

राजभवन सचिवालयाने राज्य सरकारला २२ जून, २३ जून आणि २४ जून रोजी मंजूर केलेल्या फाईल्स आणि प्रस्तावांचा तपशील देण्यास सांगितलं आहे. मागील प्रवीण दरेकर यांनी यांनी राज्यपालांना पत्र लिहून राज्य सरकारने घाईत काढलेल्या जीआरमध्ये हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहून याबाबत तपशील मागवला आहे.

हे ही वाचा:

अग्निपथ योजनेला ‘वायू’गतीने अर्ज; ९४ हजार युवक इच्छुक

धक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह

कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; २० जण अडकले

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय”

महाराष्ट्रात आघाडी सरकार धोक्यात आलेलं असताना मागील आठवड्यातील पाच दिवसात हजारो कोटी रुपयांचे सरकारी आदेश जारी करण्यात आले. पाच दिवसांत तब्ब्ल २८० सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत.

पाच दिवसातील जीआर-

Exit mobile version