महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना २२ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती बरी असून त्यांना आज, २६ जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजभवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडण्याची शक्यता असल्यामुळे या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
हे ही वाचा:
राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण
यूपीच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या तयारीत योगी सरकार
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘त्या’ ट्विटमुळे अडचणीत
राज्यात सत्ताबदलाची चिन्हं दिसू लागली आणि या सगळ्या गोंधळादरम्यानच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली. यामुळे सत्तास्थापनेसाठी तसंच अनेक महत्त्वाच्या राजकीय हालचालींवर मर्यादा आली. मात्र, आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हं आहे.