राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली माफी!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली माफी!

मुंबईत राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात राज्यपालांनी मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. आर्थिक राजधानी मुंबईबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या या व्यक्तव्यानंतर महाराष्ट्रात सर्वच थरातून टीकेची झोड उठली. गुजराती व्यापाऱ्यांनीही विरोध करत त्यांच्या या वक्तव्याला कोणीही समर्थन दिलं नव्हतं. परंतु आता मात्र या वक्तव्याबद्दल राज्यपालांनी अखेर माफी मागितली आहे. मुंबईबद्दलचे वक्तव्य माघारी घेत जनतेची माफी मागतो असे विधान राज्यपालांनी केले असून याबाबत एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे स्पष्टीकरणही राज्यपालांनी त्यानंतर दिले होते. पण तरीही त्यांच्यावरची टीका संपत नव्हती.

दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चूक झाली. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल, ही कल्पना देखील मला करवत नाही असे राज्यपालांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हे ही वाचा:

कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख

शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या

आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!news

राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करेल

महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

नेमके काय म्हणाले होते राज्यपाल?

राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते की, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.

 

Exit mobile version