एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देऊनही काही ठिकाणी एसटी कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. त्यानंतर कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आजपासून कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.

राज्य सरकाच्या विनंतीनंतर जे कर्मचारी कामावर हजर राहिलेले नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस आजपासून बजावण्यात आली आहे. सोमवारपर्यंत कामावरती हजर राहा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता. त्यानंतरही अनेक कर्मचारी संप करण्यावर ठाम राहिले आणि कामावर हजर राहिले नाही. त्यानंतर राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे.

कर्मचाऱ्यांना आता कारणे दाखवा नोटीस दिली असून या नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर तीन सुनावणी होतात त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस दिली जाते.

हे ही वाचा:

चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

राहुल गांधींची शिवाजी पार्कवरची सभा रद्द

हवामान बदलाच्या ‘सुरक्षाकरणाला’ भारताचा विरोध

श्रीलंकेत संसद बरखास्त, संसदीय लोकशाही धोक्यात?

८ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून संप पुकारला होता. वेतनवाढ आणि विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम होते. संपावरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. सरकाने कठोर भूमिका घेत कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते.

Exit mobile version