मुख्यमंत्र्यांनी काल महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली. त्याबरोबर महाराष्ट्रातील काही घटकांसाठी मदतीची देखील घोषणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले.
ते म्हणाले, कडक निर्बंधांत विविध घटकांना सरकारने मदत केली पाहिजे सरकारी पॅकेज निव्वळ धूळफेक आहे. सांगण्यात आलेली ३३०० कोटी बजेटमधली तरतूद आहे, ही वर्षभरात खर्च होणार आहे. या काळासाठी वेगळे काही नाही. सरकारकडून व्हेंटिलेटर किती वाढवणार, किती बेड्स वाढवणार, टाईम फ्रेम काय यांची माहिती अपेक्षित होती, ती मिळाली नाही असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक
मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली
महामानवाला पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून अभिवादन
त्याबरोबरच “अनेक घटकांना कुठलीही मदत सरकारने केलेली नाही. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, केशकर्तनालयवाले, फुलवाले, छोटे उद्योगवाले इत्यादी कोणालाही कुठलीही मदत नाही. उलट यात अत्यंत दिशाभूल करण्यात आली आहे. विविध योजना ज्या सांगण्यात आल्या, त्यांच्या अंतर्गत जे पैसे दिले जातात तेच पैसे आधी दिले जाणार आहेत, यात अधिकचे पैसे दिले कुठेही दिले जाणार नाहीयेत.” असेही त्यांनी सांगितले.
सरकारने आदिवासींच्या तोंडाला पाने पुसली. कारण मागच्या वर्षीचे ४००० रुपयाचे खावटी अनुदान फायनान्स सेक्रेटरीने दिलेले होते तेच दिले नाहीत. आता ₹४००० ऐवजी ₹२००० देणार, म्हणजे आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे अशी टीका देखील त्यांनी सरकारवर केली.
अन्नधान्य वितरणाबाबत फुड सिक्युरीटी मध्ये नसलेल्यांना काहीही नाही याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. २०११च्या चुकीच्या संज्ञेमुळे गरीब असलेले पण फुड सिक्युरीटी मध्ये नाहीत, त्यांना दिलासा देण्याची गरज होती, जो देण्यात आलेला नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
“फेरीवाल्यांना मागच्या काळात केंद्राकडून ₹१०,०००ची मदत केली गेली जी मोठ्या प्रमाणात मिळाली देखील. आता फेरीवाल्यांना मदत करताना त्यांनी नोंदणीकृत असाशब्द वापरला आहे. नोंदणीकृत फेरीवाले अधिकतम मुंबई, ठाणे भागात त्याच्यापलिकडे फारसे नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.”
रस्त्यावरील अन्नपदार्थ विक्रेत्यांबाबत बोलताना ते म्हणाले, “त्या विक्रेत्यांकडे संचारबंदीच्या काळात येणार कोण? शिवाय रस्त्यावरील विक्रेत्यांकडे जर पॅकेट देण्याची सोय असती तर त्यांनी दुकान सुरू केलं असतं”
यावेळी त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खाली चालली आहे. ती सुधारण्याकडे देखील लक्ष द्यायला हवे असे सांगितले. त्याबरोबरच बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनेटेड बेड्ससाठी योग्य कारवाई करावी, ऑक्सिजनचे मॅनेजमेंट सुधारावे असे देखील सांगितले.
मुंबई- पुण्याचा बाहेर देखील महाराष्ट्र आहे. त्यामुळे मी नागपूरात आलो आहे आणि इथे राहून शक्य तेवढी सगळी मदत देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.