जगातील लोकप्रिय समाजमाध्यम झालेल्या ट्वीटरवरील ११७८ अकाऊंट पाकिस्तानातील असून, ती भारतातील फुटीरतावादाला खतपाणी घालत असल्याचा भारत सरकारचा संशया आहे. ती खाती बंद करण्याचे निर्देश भारत सरकारने ट्वीटरला दिले होते. मात्र जगात एरवी मानवाधिकारांचा मक्ता घेणाऱ्या ट्वीटरने अजूनही भारत सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी केलेली नाही.
ट्वीटर हे सध्याच्या काळातील लोकप्रिय समाजमाध्यम असून, अतिशय कमी शब्दांत अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य हे माध्यम देते. मात्र याचा गैरवापर करून दुसऱ्या देशातील फुटीरतावादाला पाठिंबा देण्याचे कुकर्म काही समाजकंटकांकडून आणि देशविघातक शक्तींकडून सातत्याने केले जाते. भारतीय प्रजासत्ताक दिनी कथित शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीचे हिंसाचारात रुपांतर झाल्याची घटना ताजी असतानाच, त्यामागील खालिस्तानवादी शक्तींचा हस्तक्षेप उघड झाला. त्याबरोबरच पाकिस्तानातील काही ट्वीटर खात्यांशी देखील त्यांचा संबंध असण्याची शक्यता लक्षात घेऊन, भारत सरकारने ट्वीटरला ही खाती बंद करण्याचे आदेश दिले. मात्र दुटप्पी धोरणांनुसार वागणाऱ्या ट्वीटरने अजून यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने ट्वीटरच्या या वागणुकीबद्दल चीड व्यक्त केली होती. त्यावेळी, जर ट्वीटरने सरकारच्या निर्देशांचे पालन केले नाही तर ट्वीटरला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे देखील सांगितले होते