महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली शिवभोजन योजना अडचणीत आली असून ती बंद होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रांना अनुदान न मिळाल्यामुळे ही केंद्रे सुरू ठेवण्यास संचालकांनी असमर्थता दर्शवली आहे.
महाविकास आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली ही शिवभोजन योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्र संचालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्र सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. आधी १५ दिवसांनी मिळणारे अनुदान नंतर पाच महिन्यांवर गेले आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर बोलताना राज्यात सरकार आहे का? असा खोचक प्रश्न विचारला आहे.
हे ही वाचा:
केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या सचिवांची हत्या
२५० कुत्र्यांच्या पिल्लांना मारून माकडांनी घेतला बदला! असे काय घडले होते?
‘विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो’
धावत्या रेल्वेमध्ये पढला जातोय नमाज
शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अनेक असहाय्य वृद्ध आणि गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते.त्यामुळे यावर तातडीने उपाय न शोधल्यास गरीब- गरजू नागरिकांची अडचण होणार आहे. आधीच कोरोना काळात राज्यातील जनतेचे आर्थिक चक्र बिघडले आहे. त्यातच गरीब- गरजू नागरिकांना आवश्यक असलेली ही योजना बंद झाल्यास त्यांच्यासमोर समस्या निर्माण होणार आहे.