शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. “सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा जेव्हा निर्णय घेण्यात येत होता तेव्हाच मी शिवसेनेच्या काही नेत्यांना सांगितलं होतं. वाझेंच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं, असा इशारा मी तेव्हाच दिला होता”, असा खुलासा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अशाप्रकारचा दावा केला आहे.
“सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलंच झालं, ज्यामुळे धडा शिकायला मिळाला”, असं ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर कोणताही व्यक्ती वाईट नसतो. पण कधीकधी परिस्थिती त्यांना तशी बनवते, असंही ते यावेळी म्हणाले.
“जेव्हा सचिन वाझेला महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा समाविष्ट करण्याची योजना आखली जात होती तेव्हाच मी काही नेत्यांना सूचित केलं होतं, वाझे आपल्यासाठी अडचणी निर्माण करु शकतात. त्यांचा व्यवहार आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे सरकार अडचणीत येऊ शकतं”, असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
सचिन वाझेच्या अटकेमुळे फसले धनंजय गावडेचे गणित
उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले
संजय राऊतांवर ट्वीट करून शरद पवारांना आवाहन करण्याची वेळ
मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सचिन वाझे यांचं समर्थन केलं होतं. सचिन वाझे दहशतवादी नाही, अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत राऊत यांना विचारलं असता, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा वाझेच्या कामांबाबत माहिती नव्हती”, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं.