एपीआय सचिन वाझे यांची बदली करून त्यांना क्राईम ब्रान्चमधून हटवण्यात आले आहे. मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावरच संशयाची सुई आहे. त्यामुळे सचिन वाझेंना तातडीने निलंबीत करण्यात यावे अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच केली होती.
क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये कार्यरत असलेल्या एपीआय सचिन वाझे यांना या पदावरून हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील अशी भीती ठाकरे सरकारला असल्यामुळे त्यांना हात लावला जात नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाझे प्रकरणावरून भाजपाने मंगळवारी सभागृहाचे कामकाज बंद पाडले.
हे ही वाचा:
वाझे यांना हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील ही सरकारला भीती
वाझे यांनी या प्रकरणात अनेक गोष्टी लपवल्या. मनसुख हिरेन यांच्याशी त्यांचा पूर्व परीचय होता ही माहीती त्यांनी उघड केली नाही. हिरेन यांच्या ज्या स्कॉर्पियो गाडीत स्फोटके सापडली ती गाडी वाझे यांच्या ताब्यात गेले चार महिने होती हेही त्यांनी सांगितले नाही.
काल दिवसभर सरकारकडून मोठ्या प्रमाणात वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न झाला. मात्र विरोधकांकडून या प्रकरणी भक्कम पुरावे सादर केले गेल्यामुळे विरोधकांना या प्रकरणी वाझेंना वाचवणे अशक्य झाले आणि आज शेवटी त्यांची बदली केली गेली. मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणात सचिन वाझेंना अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.