‘माग रे सरकार’ चमकोगिरीसाठी पैशांची उधळण करते आहे

‘माग रे सरकार’ चमकोगिरीसाठी पैशांची उधळण करते आहे

राज्यामध्ये कोरोनापासून ते अनेक वेगवेगळे महत्त्वाचे मुद्दे असताना ठाकरे सरकार स्वस्तुतीत मग्न असल्याचे उघड झाले आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. माहिती अधिकारातून उघड झालेल्या आकडेवारीनुसार ठाकरे सरकाने तब्बल १५५ कोटी रुपये केवळ प्रसिद्धीवर खर्च केल्याचे कळले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार याचिका दाखल केली होती. त्यातून उघड झालेल्या माहितीनुसार ठाकरे सरकारने १५५ कोटी रुपये प्रसिद्धीवर खर्च केले होते. त्यातील ६ कोटी रुपये सोशल मिडीयावर खर्च करण्यात आले आहेत.

यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. ट्वीट करताना ते म्हणतात,

१६ महिन्यात निकम्म्या वसूली सरकारने प्रसिद्धीवर १५५ कोटी रुपये खर्च केले असून त्यापैकी ६ कोटी सोशल मीडियावर खर्च केलेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती उघड केली. केंद्राकडे सतत भिकेचा कटोरा घेऊन धावणारे माग…रे सरकार चमकोगिरीसाठी मात्र जनतेच्या पैशाची उधळण करते आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारला गरीब मुलांची नाही, ‘आपल्या’ मुलांची काळजी

शिवसेनेचा हा आमदार भाजपात जाणार?

दोन दिवसीय अधिवेशनातही विरोधक ठाकरे सरकारला घेरणार?

अखेर शिक्षकांवर बसप्रवास करण्याची मेहेरबानी

सरकार चमकोगिरीसाठी पैशाची उधळण करत असल्याची टीका अतुल भातखळकरांनी केली आहे. आजपासून सुरू झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ प्रसिद्धीवर खर्च केलेली रक्कम उघड होणे महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वीच सरकारला विविध प्रश्नांवरून विरोधी पक्षाने घेरलेले असतानाच हा नवा मुद्दा आता समोर आला आहे.

Exit mobile version