खंडणीखोर सरकारने पोलिसांकरवी वसुली सुरू केली तेव्हा पोलिसांचा धाक संपला

खंडणीखोर सरकारने पोलिसांकरवी वसुली सुरू केली तेव्हा पोलिसांचा धाक संपला

औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे. कामगार उपायुक्त कार्यालयात जमलेल्या गर्दीचं कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला इम्तियाज जलील यांनी फटका मारला. यावर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला चढवला आहे.

“महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारण्या एवढी हिंमत इम्तियाज जलील या औरंगाबादच्या खासदाराची वाढलेली आहे. खंडणीखोर सरकारने पोलिसांकरवी वसुली सुरू केली त्याच दिवशी पोलीसांचा धाक संपला. आता त्याची कटू फळे भोगावी लागत आहेत.” असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने एका दुकानावर कारवाई करण्यात आली होती. या दुकानाचं सील काढण्यासाठी खासदार इम्तियाज जलील हे व्यापाऱ्यांसोबत कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कामगार उपायुक्त कार्यालयातील जमलेल्या जमावाचं कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणार्‍या महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल खाली पाडण्यासाठी इम्तियाज जलील यांनी त्यांच्या हातावर फटका मारला. महिला कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादमधील अनेक दुकानं सील करण्यात आली आहेत. शिवाय या दुकानांना दंडही ठोठावण्यात आला आहे. परंतु छोट्या व्यापाऱ्यांना हा दंड व्यापाऱ्यांना भरणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना आपली दुकानं सुरु करता येत नाहीत. याच कारणामुळे इम्तियाज जालील कामगार कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांना जाब विचारला.

हे ही वाचा:

महिला कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याबद्दल इम्तियाझ जलील यांच्यावर गुन्हा दाखल

जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात

अब की बार, फिर से ३०० पार

रा.स्व.संघाची बदनामी केल्याप्रकरणी ‘मुंबई सागा’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

या सर्व प्रकारावर भातखळकरांनी ठाकरे सरकारच्या खंडणीखोरीचा उल्लेख करत, सरकारने पोलिसांची बदनामी केली आणि धाक संपवला असाही आरोप केला आहे.

Exit mobile version