परिवहन मंत्री अनिल परब यांचे उद्गार
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरले असल्याची खंत परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली आहे. दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मागच्या तीन महिन्यांपासून सरकार आणि एसटी संपकरी याच्यांत कित्येक वेळा चर्चा पार पडल्या पण यातून संपकऱ्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने संपकरी अजुनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. असे विधानसभेत अनिल परब यांनी सांगितले.
परब म्हणाले की, ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेले. दिवाळीच्या तोंडावर लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी कोर्टात गेलो. कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले. त्यात दोन वर्षे कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना बोनस दिला नव्हता. त्यामुळे यंदा मी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे सगळं सुरू असताना कोर्टाच्या आदेशानंतर एक एक डेपो बंद होत गेला. त्यानंतर मी पुन्हा कोर्टात गेलो. परबांनी आज विधानसभेत संप सुरू व्हायच्या आधीपासून ते आतापर्यंतच्या घटनाक्रमाची माहिती दिली.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात दिसणार हे ‘५२’ चेहरे
आमदारांना मुंबईत घरे मिळणार, पण…
आयकर विभागाने पाठवली पालिका आयुक्त चहलना नोटीस
सरनाईकांचे २ फ्लॅट आणि भूखंड जप्त
कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले. त्यावर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगाराचीही जबाबदारी घेतली. मात्र पडळकर आणि खोत यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. परंतु कामगारांनी नवा नेता निवडून संप सुरूच ठेवला. शासनाला हा संप मिटवण्यात अपयश आले. या संपावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे परब म्हणाले.