सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अनेकदा बिनडोकपणा समोर येत असतो. असाच सरकारी कामातला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. नागपूरच्या रुग्णालयात एका शुन्यामुळे अजब प्रकार घडला आहे. निधीच्या अंकांमध्ये एका शुन्यामुळे सरकारने रूग्णालयाला अतिरिक्त तब्बल ३२ कोटी जमा केले. नागपूरच्या मेयो रुग्णालयात हा अजब प्रकार घडला. २०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी मेयो रुग्णालयाला सरकारकडून ३.५ मिळायला हवे होते. पण एक शून्य वाढल्यामुळे त्यांना ३५.६३ कोटी मिळाले. मात्र, इतकी मोठी रक्कम देताना सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याला प्रश्न पडला नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. चूक लक्षात येताच सरकारने जीआर काढून १० कोटी परत घेतले आहेत. मात्र, उर्वरित निधीचे काय झाले हे अजून स्पष्ट झालेले नाही.
शासनाला मेयो रुग्णालयाला ३.५ कोटी रुपये द्यायचे होते. पण, मेयो रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून चुकून एक शून्य जास्त प्रेस झाला आणि ३५ कोटी ६३ लाख रुपये मेयोच्या खात्यात जमा झाले. मेयो रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना ही चूक लक्षात आली. ही तर छोटी कारकुनी चूक असल्याचे सांगून अतिरिक्त रक्क्म परत घेण्याची विनंती शासनाला रुग्णालयाकडून करण्यात आली. त्यासाठी शासनाने परिपत्रक काढले. १० कोटी ४३ लाख रुपये परत घेण्यात आले.
हे ही वाचा:
ओमायक्रोनच्या धास्तीने ‘या’ पंतप्रधानांनी त्यांचच लग्न केलं रद्द
प्रजासत्ताक दिनी यासाठी वाजणार ‘सारे जहा से अच्छा’
बीडमध्ये चोरांचा सुळसुळाट… भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले
एक व्यंगचित्र ठरणार आम आदमी पक्षाची डोकेदुखी?
प्राध्यापक आणि सुरक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे होते. त्यामुळे महाविद्यालयाला केवळ ३.५ कोटी द्यायचे होते. विनंतीपत्रात रकमेचे आकडे हजारात नमुद करायचे होते. लेखाविभागाकडून आकड्यासमोर एक शून्य अधिक जोडला गेला आणि हा घोळ झाल्याचे मेयो प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. मात्र, विशेष म्हणजे शासनाकडून ते मंजूर करून जमाही झालेत. त्यानंतर ही रक्कम इतर महाविद्यालयांकडे वळती करण्यात आली. त्यामुळे आणखी घोळ निर्माण झाला असून शासनाने एका आर्थिक वर्षासाठी एवढा मोठा निधी कसा मंजूर केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.