विमानप्रवासावरून राज्यपाल कोश्यारी पुन्हा चर्चेत…काय घडले?

विमानप्रवासावरून राज्यपाल कोश्यारी पुन्हा चर्चेत…काय घडले?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नुकतेच डेहराडून येथे गेले होते. त्यांच्याकरता उत्तराखंड सरकारने विमानाची व्यवस्था केली होती. परंतु यावर मात्र आता वादंग निर्माण झालेला आहे.

डेहराडून येथे या विमानाच्या आगमनानंतर काॅंग्रेस पक्षाने मात्र नियमांवर बोट ठेवले. प्रदेश काँग्रेसच्या मीडिया प्रभारी गरिमा दशौनी यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने कोश्यारी यांना सरकारी विमानाने उत्तराखंडला पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती. यातील विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. तसेच ते उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. काँग्रेसच्या राजवटीत कॉग्रेसचे नेतेही सरकारी विमानांचा वापर करत असत, कोश्यारी तर राज्यपाल आहेत.

काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना विचारले की, कोश्यारी यांना कोणत्या नियमांतर्गत सरकारी विमान उपलब्ध करून देण्यात आले आहे. दशौनी यावर म्हणाल्या की, राज्य आधीच ७० हजार कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेले आहे. राज्याची परिस्थिती बिकट आहे. असे असताना उत्तराखंडच्या मर्यादित संसाधनांवर अतिरिक्त भार आहे. सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार टाकण्याऐवजी त्यांची व्यवस्था वैयक्तिक खर्चाने करायला हवी होती,” असे दशौनी म्हणाल्या.

तसेच त्यांनी इतर सर्व माजी मुख्यमंत्र्यांना समान सुविधा देणार का, असा प्रश्नही धामी यांना विचारला. या संदर्भात विचारले असता, शिष्टाचार मंत्री धनसिंह रावत म्हणाले की, काँग्रेसने या विषयावर बोलण्यापूर्वी आत्मपरीक्षण केले पाहिजे. ते म्हणाले, “काँग्रेसच्या राजवटीत, पक्षाच्या नेत्यांनीही सरकारी विमानांचा वापर केला.

उत्तराखंड सरकारने दिलेल्या सरकारी विमानात कोश्यारीच्या आगमनाचे औचित्य साधत रावत म्हणाले की, त्यांना हा आदरातिथ्य करणे पूर्णपणे योग्य आहे. ते केवळ माजी मुख्यमंत्रीच नव्हे तर महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि ते आपल्या राज्यात पाहुणे म्हणून आले होते. धामीचे राजकीय गुरू मानले जाणारे कोश्यारी रविवारी उत्तराखंड सरकारच्या सरकारी विमानाने येथे आले होते.

हे ही वाचा:

खासगी क्लासचालकांचे इंटिग्रेटेड उद्योग

रेल्वेच्या डब्यांना आता यांत्रिक ‘आंघोळ’…वाचा!

तब्बल २३ वर्षांनी पाकिस्तानातून तो परतला आणि…

शिल्पा शेट्टी राहणार राज कुंद्रापासून वेगळी?

मागे डेहराडूनला जाण्यासाठी राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून निघाले पण महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने त्यांना विमानात बसण्याची परवानगीच नाकारली. त्यावेळी तो विषय चांगलाच गाजला होता.

Exit mobile version