सांगली जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव वगळले

सांगली जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव वगळले

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन वर्षाच्या डायरी नुकत्याच प्रसारित करण्यात आल्या आहेत. मात्र, या डायरीमधून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत असून आता नव्या वर्षी नवीन वाद निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद सर्वांसमोर आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पालकमंत्री आणि आमदार यांच्यातील वादामुळेच आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळल्याच्या चर्चांना जोर आला असून पडळकर यांचे कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. यामुळे आता सांगली जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

… म्हणून अभिनेता विकी कौशल विरुद्ध तक्रार दाखल

शिवसेनेच्या जत्रोत्सवात कोरोना नियमांचा फज्जा

‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’

योगी आदित्यनाथ यांची जाहिरात कविता कृष्णन यांना झोंबली

गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२२ या नव वर्षाची डायरी प्रकाशित केली. या डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, बँकेचे संचालक यांची नावे आहेत. जिल्ह्यातील विधानपरिषद सदस्यांची देखील यात नावे आहेत. मात्र विधानपरिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव या डायरीत नाही.

Exit mobile version