‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’

‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’

गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांवर निशाणा

मंगळवार, ३१ मे रोजी म्हणजे आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चौंडीला जात होते. तेव्हा त्यांना तिकडे जाण्यापासून पोलिसांनी अडवलं आहे. त्यांनतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान, पडळकर आणि खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

चौंडीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांना परवानगी दिली जाते मग आम्हाला का परवानगी दिली नाही, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. काहीही झालं तरी मी चौंडीला जाणार आणि अहिल्याबाईंना अभिवादन करणारच, असे आव्हान पडळकर यांनी दिले आहे. त्यांना परवानगी दिली जाते मग आम्हाला फक्त अभिवादन करण्यासाठी रोखलं जात, हे कोणत्या संविधानात येते? असा सवाल देखील पडळकरांनी केला आहे.

हे ही वाचा:

जामा मशिदीच्या घुमटाचा कळस कोसळला आणि…

‘विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणून सुरक्षा द्या’

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने सहा मुलांना ढकलले विहिरीत

समीर वानखेडेंची चेन्नईला बदली

पुढे ते म्हणाले, एवढे वर्ष पवारांना कधी चौंडीची आठवण आली नाही. अचानक पवार इकडे कसे आले, याच उत्तर त्यांनी द्यावे. रोहित पवार आणि शरद पवार या आजोबा आणि नातवाने प्रशासनवर दबाव टाकला आहे. त्यामुळे आम्हाला अडवण्यात आले आहे. मात्र काहीही झालं तरी आम्ही चौंडीला जाणार आहे, असंही पडळकर म्हणाले आहेत.

Exit mobile version