ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातील आरोप- प्रत्यारोप सुरूच असून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवारांनी टक्केवारासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची ‘फुकटं घावलं आणि गाव सारं धावलं’, अशी अवस्था केल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांनी आज ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण तो निधीही खर्च करण्याचे आदेश आयोगाला मिळाले नाहीत. आयोगाला ना ॲाफीस ना पूर्णवेळ सचिव, अशी परिस्थिती असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. आयोगाचे संशोधक सोलापुरात आणि आयोग पुण्यात, असे आहे. विजय वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
@VijayWadettiwar व @AjitPawarSpeaks यांनी मागासवर्ग आयोगास ४०० कोटी ऐवजी फक्त ४.५ कोटी दिले.ना ॲाफीस ना पुर्णवेळ सचिव.संशोधक सोलापूरात व आयोग पुण्यात.अंतरिम अहवाल तयार नाही.टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केलीये.#OBCreservation pic.twitter.com/hSzQIWwl8F
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) January 16, 2022
मंत्री ओबीसींच्या नावावर मंत्रिपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. उद्या १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. त्या करिता ठाकरे सरकारने आयोगाकडे अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही, तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्यांची मुदत न्यायालयाला मागणार असे जाहीर केले, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
हे ही वाचा:
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेची वर्षपूर्ती
दहशतवाद्याला सोडवण्यासाठी अमेरिकेत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला
आंतरजातीय विवाह केला म्हणून १५० दाम्पत्यांना केले बहिष्कृत
निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील रॅली, सभांवरची बंदी वाढवली
महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांत ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. ‘तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा, असे आवाहन पडळकर यांनी ओबीसींना केले आहे.