भाजपाच्या वतीने ‘मिशन बारामती’चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सणसणीत टीका केली.
२०२४ च्या निवडणुकीत शरद पवारांचे विसर्जन करण्यासाठी भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत. श्रीलंकेतील नेते जसे पळून गेले तसे शरद पवारांना पळून जावं लागणार आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
पवार कुटुंबियांना फक्त लोकांना लुबाडण्याची सवय लागली आहे. महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा सुप्रिया सुळे या खूप तोऱ्यात फिरायच्या, पण आता त्यांचा तो तोरा संपणार आहे. कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामतीचे ऑपरेशन त्या केव्हा करतील याचा पत्ताही लागणार नाही. त्यामुळे यंदा बारामतीत बदल होणारच हे निश्चित आहे, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
“बारामती हा बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी आहे. शरद पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते. माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा,” असेही पडळकरांनी कार्यकर्त्यांना म्हटले.
हे ही वाचा:
थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?
ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ
ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी
१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा
“महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली. जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री होते, तेव्हा एकाही शेतकऱ्याची वीज जोडणी तोडण्यात आली नाही. मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारला देता आले नाही. ओबीसी आरक्षण शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आलं की परत मिळवले, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.