आपला हक्क आता हिसकावून घ्यावा लागेल

आपला हक्क आता हिसकावून घ्यावा लागेल

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. बुधवार, १५ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसत असून ठाकरे सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाज माध्यमांवर एकक व्हिडीओ पोस्ट करत सरकारला धरीवर धरले आहे. ‘आपला हक्क आता हिसकावून घ्यावा लागेल’ असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.

“आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या नौटंकीचा बहुजनांच्या समोर पर्दाफाश झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अध्यादेश काढण्यापूर्वी तुम्ही इम्पिरिकल डेटा गोळा करा आणि मग अध्यादेश काढा. पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग ढोकळा करायचा होता म्हणून त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला. सुरुवातीपासून प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका आणल्याचा आव आणला जात होता हे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

‘दोन वर्षांत राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशांचे पालन का केले नाही?’

मुंबईत १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू

ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी

विराट म्हणतो रोहित आणि माझ्यात वाद नाहीत

यांनी आयोगाला वेळीच पैसे आणि बसण्यासाठी जागा दिली असती तर ही वेळ आली नसती. आयोगाने ५० कोटी रुपये मागितले होते. पण या सरकारने केवळ पाच कोटी रुपये दिले. मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि राज्यातील बहुजनांना विनंती करतो की आपला हक्क मागून मिळणार नाही. तो या सरकारकडून हिसकावून घ्यावा लागेल. जोपर्यंत शकुनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे हे सरकार आहे तोवर हे सरकार फक्त नाटक करत राहणार. तेव्हा आपण सगळे एक होऊया आणि लढा देऊया असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.”

Exit mobile version