31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणभागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंब मोदी सरकारच्या नावाने!

भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंब मोदी सरकारच्या नावाने!

Google News Follow

Related

गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर खरपूस टीका

‘शरद पवार यांना अचानक ओबीसींबद्दल प्रेम उफाळून आले आहे. असं म्हणतात की, ते कोणतंही काम हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतू कधीही दाखवत नाही. मला त्यांना इतकंच सांगायचे आहे की, केंद्राने ताट वाढले आहे, हे खरे आहे आणि तुमचे हात बांधले आहेत हेही खरे आहे. पण हे हात बांधले गेले कुणामुळे ते सांगा, असा खणखणीत सवाल भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरून केंद्रावर टीका केली. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा संपवा, इम्पिरिकल डाटा द्या, जातनिहाय जनगणना करा अशा मागण्या पवारांनी केल्या. त्याचा पडळकर यांनी खरपूस समाचार घेतला.

पडळकर म्हणाले की, पवारांचे हात बांधले गेले ते केंद्रामुळे की आपल्या पै पाहुण्यांमुळे. उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, नातू, मुलगी यांना मोठे करण्यासाठी काम केले. जेव्हा जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा तुम्ही तुमच्या करामतींनं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण घालवलं, जो २०११ चा जनगणना अहवाल आज तुम्ही मागत आहात, त्यातला घोळ तुम्ही सत्तेत असलेल्या मनमोहन सिंग सरकारनेच घातला आहे.

हे ही वाचा:

पालिकेचा भंगारात नवा कोरा घोटाळा?

भारतीय गोलंदाज लॉर्ड्स ऑफ क्रिकेट; भारताने इंग्लंडला नमविले

शेवटी अनधिकृत बांधकामांवर म्हाडाचा हातोडा

खिळखिळ्या इमारतींबरोबर सेवाशुल्कामुळे म्हाडाचे रहिवाशीही जर्जर

भागीदारी तुमची, पाप तुमचं, बोंब मोदी सरकारच्या नावाने ठोकायच्या. मला जातीयवादी विष पेरणाऱ्यांना विचारायचे आहे की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी तुम्हाला जातनिहाय डाटा हवाय कशाला, तुम्हाला इम्पिरिकल डाटा हवा आहे, शिवाय, मराठा आरक्षणाबाबत  ते मागासलेले आहेत हे सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. भूलथापा मारायच्या लोकांचे लक्ष विचलित करायची, ही करामत बहुजन मुलांना कळलेली आहे. जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना पळ काढतात. ते शरदचंद्र पवार आज भूमिका मांडत आहेत. त्यांना भूमिका मांडावी लागली हेच बहुजनांच्या प्रस्थापितांविरुद्धच्या लढाईचे यश आहे, असेही पडळकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा