राज्यपाल महोदय, एसटी संपात हस्तक्षेप करा!

राज्यपाल महोदय, एसटी संपात हस्तक्षेप करा!

एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा आणि एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला आहे. सरकारकडून या संपाकडे आणि मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या संपात हस्तक्षेप करून मार्ग काढा, अशी विनंती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर भेट घेतली. या शिष्टमंडळात सदाभाऊ खोत, ऍड. गुणरत्न सदावर्ते, ऍड. जयश्री पाटील आणि पाच महिला एसटी कर्मचारी यांचा समावेश होता. राज्यपालांना भेटल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा:

विनोदाच्या नावाखाली वीर दासकडून अमेरिकेत भारताची बदनामी; मुंबईत तक्रार

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातील मिळणार फक्त ५९ रुपये

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा रक्षकाला दीड कोटी मिळतच नव्हते

राज्यातील १०४ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचे आमरण उपोषण

जवळपास ३६ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काल खासगी गाडीतून जाताना पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. संपावर तोडगा काढण्याऐवजी सरकार संपात फूट पाडण्याचे काम करत आहे. कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सेवा समाप्तीच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामगार भयभीत झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्यपालांची भेट घेतल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

सुरू असलेल्या संपाविषयी परिवहन मंत्री, परिवहन सचिव आणि सरकारकडून माहिती घ्या. इतके दिवस सरकार काय करत आहे याविषयीही माहिती घ्या, अशी विनंती राज्यपालांना केली आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. विनंतीवर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

Exit mobile version